आपत्ती व्यवस्थापन' आणि 'मानवी सुरक्षितता' यावर आधारित संरक्षणशास्त्रातील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव
Main Article Content
Abstract
आजचा समाज अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या छायेखाली आहे. भूकंप, पूर, दुष्काळ, चक्रीवादळे, आग, अपघात, महामारी अशा विविध आपत्ती नियमितपणे होत आहेत. या आपत्तींमध्ये अनेक वेळा मोठ्या प्रमाणावर मानवी हानी, मालमत्ता नुकसान आणि पर्यावरणीय समतोल बिघडत असतो. या परिस्थितीत 'आपत्ती व्यवस्थापन' हे एक महत्त्वाचे शास्त्र म्हणून उदयास आले आहे. हे फक्त तांत्रिक पातळीवर नाही, तर सामाजिक पातळीवरही खूप महत्त्वाचे आहे. मानवी सुरक्षिततेचा प्रश्न यासोबतच जोडलेला आहे. आपण सुरक्षित राहण्यासाठी केवळ पोलीस, लष्कर किंवा आपत्ती निवारण दलावर अवलंबून राहू शकत नाही. नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संरक्षणशास्त्रातील उपक्रमांतून आपत्ती व्यवस्थापन आणि मानवी सुरक्षिततेविषयी माहिती देणे, त्यात प्रत्यक्ष सहभाग घ्यायला शिकवणे आणि त्यातून सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हे संशोधनाचे केंद्रबिंदू आहेत
Article Details

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial 4.0 International License.
References
पॅटन, डी. (2006). आपत्ती लवचिकता: नैसर्गिक धोके आणि त्यांच्या परिणामांसह सहअस्तित्वाची क्षमता निर्माण करणे. डी. पॅटन, आणि डीएम जॉन्स्टन, आपत्ती लवचिकता: एकात्मिक दृष्टीकोन (pp. 3-10) मध्ये. चार्ल्स सी थॉमस.
(2017). सुरक्षित, मजबूत, हुशार: शाळेतील नैसर्गिक धोक्याची सुरक्षितता सुधारण्यासाठी मार्गदर्शक. वॉशिंग्टन, डीसी: फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी.
शाळेची सुरक्षा . (2017, 4 ऑगस्ट). राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्राप्त:
http://www.ndma.gov.in/en/media-public-awareness/kids-section/school safety.html(2015). आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी सेंडाई फ्रेमवर्क 2015-2030. सेंडाई: संयुक्त राष्ट्र.
ट्विग, जे. (2009). आपत्ती प्रतिरोधक समुदायाची वैशिष्ट्ये. लंडन: UCL धोका संशोधन केंद्र.
विजर, बी., इलन केल्मन, टीएम, बोथारा, जेके, अलेक्झांडर, डी., दीक्षित, एएम, बेनोअर, डी., पटेल, एम. (2004). शाळेतील भूकंपाची सुरक्षा: भेगा पडत आहेत ? C. Rodrigue, & E. Rovai मध्ये, Earthquakes (pp. 1-56). लंडन: रूटलेज.