किशोरवयीन मुलांमधील समाज माध्यमांचा वाढता वापर आणि मनोसामाजिक आरोग्याची आव्हाने

Main Article Content

अर्चना तुळशीराम सुर्यवंशी, डॉ. नगीन मधुसुदन पटेल

Abstract

आधुनिक काळात समाज माध्यमे ही किशोरवयीन मुलांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहेत. मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्सअॅप, यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या माध्यमांमुळे मुलांना संवाद, माहिती, मनोरंजन, शिक्षण आणि अभिव्यक्तीची संधी उपलब्ध झाली आहे. मात्र या माध्यमांचा अतिवापर किशोरवयीन मुलांच्या मनोसामाजिक आरोग्यासमोर नवी आव्हाने निर्माण करतो. सतत ऑनलाइन राहणे, इतरांशी तुलना करणे, पसंतीचिन्हे व प्रतिक्रिया यांची अपेक्षा ठेवणे, ऑनलाइन छळाला सामोरे जाणे, झोपेचा अभाव आणि अभ्यासातील विचलन यांमुळे चिंता, नैराश्य, चिडचिड, आत्मविश्वासात घट आणि सामाजिक दुरावा निर्माण होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार किशोरावस्था ही मानसिक व सामाजिक विकासाची संवेदनशील अवस्था आहे, म्हणून समाज माध्यमांचा परिणाम या वयोगटावर अधिक तीव्रतेने होतो. योग्य डिजिटल साक्षरता, पालकांचे मार्गदर्शन, शालेय समुपदेशन आणि संतुलित वापर यामुळे समाज माध्यमांचा विधायक उपयोग शक्य आहे.

Article Details

How to Cite
अर्चना तुळशीराम सुर्यवंशी, डॉ. नगीन मधुसुदन पटेल. (2025). किशोरवयीन मुलांमधील समाज माध्यमांचा वाढता वापर आणि मनोसामाजिक आरोग्याची आव्हाने . International Journal of Advanced Research and Multidisciplinary Trends (IJARMT), 2(4), 743–746. Retrieved from https://ijarmt.com/index.php/j/article/view/951
Section
Articles

References

UNICEF. “Cyberbullying: What Is It and How to Stop It.” UNICEF, 2024, Page No. 103

पलसाने, म. न. सामाजिक मानसशास्त्र. कॉन्टिनेन्टल प्रकाशन, 2005, पृ. क्र. 11

ढोरमारे, अभिमन्यू. सामाजिक मानसशास्त्र. उन्मेष प्रकाशन, 2015, पृ. क्र. 28

शेळके, भास्कर. प्रसार माध्यमे आणि मराठी भाषा. स्नेहवर्धन प्रकाशन, 2005, पृ. क्र. 02

घाटोळे, रा. ना. सामाजिक मानसशास्त्र. श्री मंगेश प्रकाशन, नागपूर, 2002, पृ. क्र. 61

Faverio, Michelle, and Olivia Sidoti. “Teens, Social Media and Technology 2024.” Pew Research Center, 12 Dec. 2024, Page No. 02

Office of the Surgeon General. Social Media and Youth Mental Health: The U.S. Surgeon General’s Advisory. U.S. Department of Health and Human Services, 2023, Page No. 203

Similar Articles

<< < 6 7 8 9 10 11 12 > >> 

You may also start an advanced similarity search for this article.