आधुनिक मराठी कादंबरीतील बदलते सामाजिक वास्तव

Main Article Content

प्रा. डॉ. विनोद वासुदेव उपर्वट

Abstract

कादंबरी हा समाजातील बदलांचे सूक्ष्म आणि व्यापक चित्रण करणारा महत्त्वाचा साहित्यप्रकार आहे. आधुनिक मराठी कादंबरीने व्यक्ती आणि समाज यांच्या बदलत्या नात्याबरोबरच ग्रामीण जीवन, कृषिसंकट, शहरीकरण, बेरोजगारी, स्त्री-अस्मिता, जातीय विषमता, विस्थापन, राजकीय सत्तासंघर्ष, सांस्कृतिक संक्रमण आणि जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या नव्या प्रश्नांना प्रभावी अभिव्यक्ती दिली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात समाजपरिवर्तनाचा वेग वाढल्यामुळे मराठी कादंबरीचे अनुभवविश्वही अधिक व्यापक, बहुपदरी आणि संघर्षशील झाले. कोसला, पांगिरा, बारोमास, झाडाझडती, रीटा वेलिणकर, ताम्रपट, सनातन आणि हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ यांसारख्या कादंबऱ्यांमधून बदलत्या समाजाच्या विविध स्तरांचे दर्शन घडते. प्रस्तुत शोध निबंधात आधुनिक मराठी कादंबरीचा केवळ साहित्यिक स्वरूपात विचार न करता समाजातील संरचनात्मक बदलांची संवेदनशील नोंद करणारे माध्यम म्हणून विश्लेषण करण्यात आले आहे. कादंबरीतील बदलते वास्तव हे केवळ परिस्थितीचे वर्णन नसून व्यक्तीच्या अस्वस्थतेचे, सामाजिक संघर्षाचे आणि परिवर्तनाच्या आकांक्षेचे अभिव्यक्त रूप असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होते.

Article Details

How to Cite
प्रा. डॉ. विनोद वासुदेव उपर्वट. (2026). आधुनिक मराठी कादंबरीतील बदलते सामाजिक वास्तव. International Journal of Advanced Research and Multidisciplinary Trends (IJARMT), 3(2), 1744–1753. Retrieved from https://ijarmt.com/index.php/j/article/view/1366
Section
Articles

References

मुखर्जी मीनाक्षी, रिअॅलिझम अँड रिअॅलिटी: द नॉव्हेल अँड सोसायटी इन इंडिया. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, नवी दिल्ली, 1994, पृ. क्र. 218

नाईक शोभा ए., 1960 नंतरच्या मराठी कादंबरीचे स्त्रीवादी भूमिकेतून आकलन, पीएच.डी. प्रबंध, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, 2003 (अप्रकाशित ग्रंथ)

नेमाडे भालचंद्र, कोसला. पॉप्युलर प्रकाशन प्रा. लि., मुंबई, 2013, पृ. क्र. 334

बर्वे छाया, नवोदोत्तर मराठी ग्रामीण कादंबरी, पीएच.डी. प्रबंध, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, 2003 (अप्रकाशित ग्रंथ)

पाटील विश्वास, पांगिरा, राजहंस प्रकाशन प्रा. लि., पुणे, 2014, पृ. क्र. 192

देशमुख सदानंद, बारोमास, मिहाना पब्लिकेशन्स, पुणे, 2002, पृ. क्र. 363

पाटील विश्वास, झाडाझडती, राजहंस प्रकाशन प्रा. लि., पुणे, 1991, पृ. क्र. 477

गोखले शांता, रीटा वेलिणकर, मौज प्रकाशन गृह, मुंबई, 2009, पृ. क्र. 112

पठारे रंगनाथ, ताम्रपट, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर, 2022, पृ. क्र. 848

लिंबाळे शरणकुमार, सनातन, दिलीपराज प्रकाशन प्रा. लि., पुणे, 2018, पृ. क्र. 214